अर्थ प्रेमाचा 【नजरेतून माझ्या】

  अर्थ प्रेमाचा 【नजरेतून माझ्या】

👇

ती वेडी मला सतत विचारत असते  "हर्षु"  अरे हे प्रेम काय आहे आणि त्याचा तुझ्या नजरेत अर्थ काय आहे ? 🤔🙄
आता तुम्हीच सांगा हिच्या ह्या प्रश्नाच काय उत्तर देऊ मी ! 😅

●●●●●

ती :- ओए मिस्टर कवी माझ्या ह्या छोट्याश्या प्रश्नाला अजून किती दिवस टाळणार आहे हा....😐

तो :- हम्मम तू का मला कायम कोड्यातच टाकायचं ठरवलंय का ? ज्या गोष्टीची परिभाषा मोठ-मोठे साहित्यिक देखील आपल्या शब्दरूपी रचनेत नाही मांडू शकले तर मी आपला बिचारा कसं काय सांगू शकेल...हा !!😌😅

ती :- वाह ...काय मस्त बहाणा मारला आहे...😏तरी मला काही माहीत नाही, तू आता प्रेमाचा अर्थ तुझ्या नजरेतून लिहून मला ते वाचायला देत आहे म्हणजे देत आहे बास... 😤👊

तो :- अजिब जबरदस्ती आहे यार तुझी तर...असं थोडी असतं काही 🤔🙄

ती :- मग....विसरला का...मुझे हक्क हैं । 😂😜
तो :- करतो प्रयत्न...😐👊

•••••••
उफ्फफ.....काय यार हे सगळं.....
मंडळी काय वाटते आता तो कसा सांगेल तिला त्याच्या नजरेत असलेल्या प्रेमाचा अर्थ
जरा कठीणच दिसत आहे याचं नाही का....😄😅
••••••••

तो :- काही कळत नाही आहे यार आता तिला कसं समजावून सांगू की , मी प्रेमाबद्दल इतका गहरा विचार कधीच केला नाही । मी बस प्रेम केलं तिच्यावर आणि तसही प्रेम वैगरे ह्या गोष्टी काय अश्या ठरवून होत असतात  का ? 🤔 म्हणजे पहा आपण आपल्याप्रमाणे हव्या त्या गोष्टी घेऊ शकतो आणि नसल्या तर त्या बनवून देखील घेऊ शकतो पण
प्रेम...... (तो स्वतःशीच बोलताना)

असो...
आता  तिने म्हटलं आहे म्हणजे करावंच लागेल , काही दुसरा पर्याय आहे का
माझ्याकडे कारण " तिला हक्क आहे ना " 😌 करतो मग एक छोटासा प्रयत्न कवितेतुन सांगायचा "अर्थ प्रेमाचा नजरेतून माझ्या"

आपण ही वाचा आणि सांगा माझा हा एक छोटासा प्रयत्न कसा वाटला ते आपल्या प्रतिक्रियाची वाट तर राहीलच म्हणा 😉 😄

जास्त वेळ न घालवता सुरू करूया
●●●●●

👇
•• अर्थ प्रेमाचा 【नजरेतून माझ्या 】•••


प्रेम काय आहे ? 🤔

सकाळी डोळे उघडण्यापुर्वी
जिचा
चेहरा पाहण्याची इच्छा होते 👀
ते प्रेम आहे..... ❤️

मंदिरामध्ये दर्शन करताना
जी
जवळ असल्याचा भास
होतो ते प्रेम आहे.....❤️

नेहमी भांडून सुद्धा
जिचा
राग येत नाही
ते प्रेम आहे.....❤️

जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर
पूर्ण
दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते
ते प्रेम आहे.....❤️

कुशीत जिच्या डोके ठेवल्यावर
आतून
पूर्ण मन मोकळे
झाल्यासारखे वाटते
ते प्रेम आहे.....❤️

स्वत:ला कितीही त्रास झाला
तरीही
जिच्यासाठी कायम ख़ुशीच मागता
ते प्रेम आहे.....❤️

जिला
लाख विसरण्याचा प्रयत्न करा
तरीही
काही केल्या जिला विसरता येत नाही
ते प्रेम आहे.....❤️

कुटुंबाच्या फोटो मध्ये
आई-बाबांच्या सोबत
जिचा
फोटो असावा असे
आपल्याला कायम वाटणे
ते प्रेम आहे.....❤️

आधी आपण जिच्या चुकांना रागावतो
नंतर तिची समजूत काडून राग तिचा तो घालवतो
आणि
आठवून ते नंतर एकांतात
हसू येते
ते प्रेम आहे.....❤️

आणि हो बरं का
सर्वात महत्वाचे म्हणजे हि कविता वाचताना प्रत्येक ओळीला तुम्हाला जिची आठवण आली ना
तेच प्रेम आहे 😉
हो ते प्रेमच आहे । 😀 🙌

★★★★★


Source: Fb Image


सर्वाना सप्रेम नमस्कार 🙏 आपल्याला माझी ही  नवीन रचना
अर्थ प्रेमाचा 【नजरेतून माझ्या】 " 
कशी वाटली ते आपण आपल्या अमूल्य प्रतिक्रिया द्वारे  व्यक्त होऊ शकता आणि आपल्या जर  काही सूचना असल्यास त्या देखील आपण या द्वारे देऊन मुक्तपणे सांगू शकता ।
🤗

आपल्या सर्व सूचनांचे सहर्ष स्वागत आहे 🤘 ❤️
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत ।
😇 🙏

आपलाच एक वाचक लेखक मित्र
-harsh_मधुरज़०✍️

•••••••••••••••••
सदर रचनेचा माझ्या वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही तरी ती आपण वाचताना त्या विषयावर असलेली केवळ एक काल्पनिक रचना असे ग्राह्य धरून वाचावी ही विनंती
🤗 🙏
•••••••••••••••••

आपलाच एक वाचक लेखक मित्र
-harsh_मधुरज़०✍️

आता आपण मला खालील लिंक द्वारे वेगवेगळ्या
"Social Media" ला Follow देखील करू शकता ।

खास आपण सर्वांसाठी
😄❤️
👇

instagram :-https://www.instagram.com/manatlaby_hrg/
FB_Page  :- https://www.fb.com/manatlabyHRG
E-mail id :- harshalhrg93@gmail.com
WA_No.    :-  866-88-22-900


समाप्त "
★★★★★

Comments

  1. गणेश दळवीTuesday, September 21, 2021

    खुप भावस्पर्शी लिहीलयस 🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  2. किती सुंदर लिहितोस रे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद मॅडम
      आपलं प्रेम आणि सहकार्य कायम असंच असू द्या । 🤗🙏

      Delete
  3. खुप मस्त लिहिलंय तु कवियत्री नाही खुप मोठी लेखिका बधशिल👍👍👍👍👍🍁🍁🙏🙏🙏🪔

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर इतक्या छान प्रतिक्रिया साठी । 😀 ✌️

      Delete
  4. नेहमीप्रमाणेच खूप सुंदर हर्ष...����✍️����

    ReplyDelete
  5. सर्वप्रथम तर सर आपण खूपच जबरदस्त व धमाकेदार एंट्री केलीत 🙏🙏🙏
    दुसरं म्हणजे आपली लेखन शैली व आपली लेखन पद्धत एकच नंबर 👍👍👍 क्या कहना
    👌👌👌 आणि तिसरं म्हणजे blog तर mind blowing बनवलाय 🤗🤗🤗
    आणि रचना सर्वोत्कृष्ट लिहिलीत एकच नंबर 👏👏👏
    पुढील लिखाणासाठी व आपल्या यशप्राप्तीसाठी मनापासुन खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. वाह मस्त , मन भरून आलं आपली प्रतिक्रिया वाचून
      माझ्या लेखन कार्यावर आपलं प्रेम आणि सहकार्य कायम असच असू द्या । 😇 ✌️

      Delete
  6. अतिशय सुरेख रचना केली सर 👌👍👌

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद मॅडम ☺️ ✌️

      Delete

Post a Comment

आपल्या अमूल्य भावनांना इथे मोकळीक द्या ।🤗