माझ्यातली तू - तुझ्यातला मी


माझ्यातली तू - तुझ्यातला मी


 .....हर्षु अरे आपल्यातला नातं हे प्रेमाचं आहे की काही औरच  ?🤔.... प्रेम म्हणजे नेमकं काय रे ? 🙄 , आपण खरंच एकमेकांच्या प्रेमात आहोत का ?  आपलं नातं काय आहे नेमकं ?😶 .........( तिनं त्याला रागात विचारलं )

●●●●●●●●●

मागे आपण  फोन वर बोलत असतांना तू विचारलेल्या तुझ्या ह्या प्रश्नाने तर मला कोंडीतच धरलं होतं ग मी पण विचारातच पडलो😉 , अरे आपलं खरंच हिच्यावर प्रेम आहे की बस सहवास आवडतो  हिचा आपल्याला 🤔 (बरं का आमचं हे ते दूरचा की काय नातं असतं ना काय ते ... हं आठवलं  Long Distance Relationship ते आहे गेल्या काही वर्षापासून  ) 🤑
मी थोडं विचार केल्यावर काही उत्तर देणार इतक्यातच तू...... चल आपण नंतर बोलूया आई आवाज देत आहे . नंतर तसं पाहायला गेलं तर फार वेळ आपलं बोलणं झालं पण तू या बद्दल कधीच काही बोलली नाही(कदाचित तुला पण ठाऊक होतं की मी सध्या कुठल्या परिस्थितीतुन जात आहे 【नवीन business आणि बाकी बरंच काही】 ) 😇🤗

●●●●●●●●●

पण आपण जेव्हा जेव्हा video call वर बोलायचो तेव्हा बोलतांना मला ते सगळं तुझ्या चेहऱ्यावर प्रकर्षाने जाणवायचं , पण मी सगळं चांगली वेळ आली की सांगूंया , सगळं आरामात समजावून सांगूंया म्हणून टाळत गेलो , आणि तुझे प्रेमाबद्दल (आपल्या प्रेमाबद्दल म्हटलं तर जास्त योग्य राहील ) असलेले doubt दूर करूया . 🤓

पण कुणी तरी महान व्यक्तीने खरंच म्हटलं आहे , की  वेळ आणि काळ हा आपल्याच हातात असतो तो कधीच चांगला किंवा वाईट नसतोच मुळीच , आपण त्याला कसं घडवतो तस तसा तो घडत जातो ( परिस्थिती पण महत्वाच्या भूमिकेत असते ये काही वेगळं सांगायला नको ) . 😜

●●●●●●●●●

तू सांगत नसली तरीही तुझ्या मनातल्या विचारांची कोंडी आता जरा जास्तच वाढत चालली होती , आणि त्याचा तुझ्यावर आणि  तुझ्या स्वभावावर होणारा परिणाम देखील नकळत पणे मला जाणवत होता 😕, आणि हे मला मुळीच चालणारं नव्हत कारण माझे जे काही उपद्व्याप सुरू होते (आणि आहे) ते शेवटी आपल्यापर्यंतच येऊन संपतात ना , 😘😘❤️

म्हणूनच मग ठरवलं की भेटून सगळं काय ते व्यवस्थित सांगायच प्रयत्न करायचा पण म्हणतात ना " कुछ पाना हैं तो कुछ खोना भी होगा ", वेळेच्या अभावामुळे आपली भेट पण काही होऊ शकली नाही .😟

●●●●●●●●●

मग काय एकच पर्याय दिसला आणि तो म्हणजे तुला एक पत्र लिहायचं आणि त्यात तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचं, म्हणूनच हा सगळा उपद्व्याप. I know हे  जरा जुनी पद्धत आहे पण तितकीच प्रभावी यात दुमत मुळीच नाही .😜😜

अजून एक , तुला bore नको व्हायला म्हणून जरा थोडक्यातच उत्तर देण्याचं प्रयत्न करतोय 😉
" हम उम्मीद करते हैं आपको हमारा ये प्रयत्न नक्कीच आवडेगा ". 😂😜

      तर मग चला सुरू करूया......




●●●●●●●●●

प्रेम म्हणजे दोन वर्तुळांना (circle)  घडवत जाणारा देवाणघेवाणीचा राजमार्ग आहे. 🤗

आपलं वर्तुळ दुसऱ्या वर्तुळासारखं का नाही असा विचार करू नये. आपलं वर्तुळ दुसऱ्या वर्तुळासारखं करण्याचा प्रयत्नही करू नये. दुसरं वर्तुळ पाहून आपल्या वर्तुळाचे अर्थही लावू नयेत. आपापलं वर्तुळ समजून घेण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावा. 😄

ही थट्टा नाही. याचे शिकवणी वर्ग नसतात. counseling चा काही फार उपयोग नसतो. हा स्वत: न चाललेला स्वत:चा रस्ता असतो. 😇

it is not only the road less travelled, it is a road not at all travelled. But still one has to travel it. 😎✌️

●●●●●●●●●

हे सोपं नाही. कठीणच आहे. पण तेच प्रेम आहे. तेच खरं आहे. तेच असणं आहे. या fantasy च्या धडपडीत मी स्वत:ला हरवून बसलो, तर तू कोणावर प्रेम करणार😜😂
किंवा
या fantasy च्या धडपडीत तू स्वत:ला हरवून बसलीस तर मी कोणावर प्रेम करू? 😕🤔

पगलू तुझी आपल्या नात्याबद्दल असलेली काळजी मी समजू शकतो. 😘😘

●●●●●●●●●

हे स्वत:ला न सोडणं अन तरीही स्वत:ला घडवत जाणं, बदलत जाणं हेच आहे प्रेम. 😘
हेच आहे जगणं. 😘
आपण प्रेम करतो म्हणजे स्वत:ला घडवत असतो.
कधी देऊन तर कधी घेऊन,

प्रिये.....तू मला काय-काय दिलंय अन माझ्याकडून काय-काय घेतलंय ?
अन मी तुला काय काय दिलंय अन तुझ्याकडून काय काय घेतलंय ? 😉


ये लवकर... कॉफीचा कप तुझी वाट पातोय.😀😉🤘

       

     फक्त  तुझाच
-harsh_मधुरज०✍️

                         

●●●●●

सर्व वाचक-लेखक मित्र मंडळीना माझा नमस्कार  🙏
आपल्याला माझी ही नवीन कलाकृती कशी वाटली आपण ते त्यावर आपल्या अमूल्य प्रतिक्रिया देऊन व्यक्त होऊ शकता
आणि
जर आपल्या काही सूचना, संदेश असल्यास तो देखील कळवू शकता 🤗

आपल्या सर्व सूचनांचे सहर्ष स्वागत आहे 🤘 ❤️
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत ।
😇 🙏

आपलाच
-harsh_मधुरज़०✍️

आपण मला खालील लिंक द्वारे वेगवेगळ्या Social Media ला Follow देखील करू शकता ।
खास आपल्या साठी 😄❤️

👇

Instagram :-  https://www.instagram.com/manatlaby_hrg/
FB_Page   :-  https://www.fb.com/manatlabyHRG
E-mail id   :-  harshalhrg93@gmail.com
WA_No.    :-  866-88-22-900

★★★★★

Comments

Post a Comment

आपल्या अमूल्य भावनांना इथे मोकळीक द्या ।🤗