"का कुणास ठाऊक"
👇
का कुणास ठाऊक
पण
आज मी तिला खूप miss करतोय ।
कुठे हरवली काय माहिती ती
आज मात्र मी स्वतःच स्वताशीच बोलतोय
अगं जायचं तर सांगून तरी जायचं होतस ना...
अशी कशी गेली तू अचानक निघून
आता अनोळखी चेहऱ्याच्या ह्या दुनियेत ही
तिलाच मी शोधत बसलोय
दमलोय आता मात्र
आज मी तिला खूप miss करतोय ।
ती आली भेटायला कि असायची तिची ती नुसती गडबड-बडबड
मग आजच का जणू सगळी भयाण शांतता पसरलीय इथे
कुठे गेली रे ही…..तिला आज मी खूप miss करतोय ।
येईल या आशेवर आज मी इथेच बसून राहणार
शेवटच्या श्वासेच्या हुंदक्यात ही तिलाच शोधणार
माझी तहान-भूक मेलीय हे तिला आता कधी कळणार
आज कसं सगळंच वेगळंच वाटतंय जणू
रोजच्या गर्दीपासून माझं मलाच आज अलग-थलग झाल्यासारखं वाटतंय
कुठे गेली रे ही…..तिला आज खूप miss करतोय
लवकर ये ग
वाट पाहतोय मी तुझी
तिथेच…..
तुझाच
-harsh_मधुरज़० ✍️
●●●●●
सर्व वाचक-लेखक मित्र मंडळीना माझा नमस्कार 🙏
आपल्याला माझा हा नवीन लेख कसा वाटला ते आपण त्यावर आपल्या अमूल्य प्रतिक्रिया द्वारे व्यक्त होऊ शकता
आणि
जर आपल्या काही सूचना, संदेश असल्यास तो देखील कळवू शकता । 🤗
आपल्या सर्व सूचनांचे सहर्ष स्वागत आहे 🤘 ❤️
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत ।
😇 🙏
●●●●●
आपलाच
-harsh_मधुरज़०✍️
आता आपण मला खालील लिंक द्वारे वेगवेगळ्या "Social Media" ला Follow देखील करू शकता ।
खास आपल्या साठी
😄❤️
👇
instagram :- https://www.instagram.com/manatlaby_hrg/
FB_Page :- https://www.fb.com/manatlabyHRG
E-mail id :- harshalhrg93@gmail.com
WA_No. :- 866-88-22-900
★★★★★
अप्रतिम सुंदर लिखाण
ReplyDeleteधन्यवाद सर 🤗 ✌️
Deleteसुंदर लेखन ✍️👌👌
ReplyDeleteधन्यवाद 😀✌️
Deleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद मॅडम 🤗✌️
Delete