सर्व वाचक मित्र-मैत्रिणींना आपल्या एका वाचक-लेखक मित्राचा सप्रेम नमस्कार 😇 🙏
आज मी आपल्यासमोर माझी एक नवीन कलाकृती सादर करत आहे , आशा आहे आपल्याला माझं हे नवीन प्रयत्न नक्की आवडेल । ❤️ 😃 🙏
👇
❤️ •• संभाषण { तिचं - माझं } •• ❤️
तो :- वाह...चालेल तुला मी माझ्या मैत्रीणीसोबत माझा वेळ घालवला तर 😅😂
ती :- न चालायला काय झालं, त्या मैत्रिणी आहे आणि मी....😬 , असो तुला काय वाटतं कोण असते एक मैत्रीण आणि तुझ्या काय अपेक्षा आहे एका मैत्रिणीनं कडून 🤔😅
तो :- बाप्पा बाप्पा 😂 ; असं कधी विचार तर नाही केला पण तरीही एक छोटा प्रयत्न करतो वाच आणि सांग 😬 ; आणि हो या मी.... च मला सविस्तर उत्तर लागेल बरं 😉
ती :- हो का 🤐👊
तो :- हो 😆 , बरं घे खास तुझ्याचसाठी " आयुष्यात एकतरी अशी मैत्रीण असावी "
👇
आयुष्यात एकतरी अशी मैत्रीण असावी
●●●●●
आयुष्यात एकतरी अशी मैत्रीण असावी ,
कायम Miscall देऊन वैताग आणणारी ,
नेहमी Blank Message पाठवणारी ,
रागात असल्यावर हक्काने जीच्यावर राग व्यक्त करता येईल अशी ,
आणि
का रागात आहे हे ही न सांगताच स्वतः शोधणारी,
मला बोलावसं वाटत होतं हे न मान्य करून,
अरे आज ना फारच बोर होत होतं रे , असं म्हणून
जरा वेळ घालवावा म्हणून फोन करून
माझं डोक सतत Out करणारी ,
मात्र
माझं मूड ऑफ झाल्यावर फालतू आणि टुकार विनोद सांगून पोट दुखेपर्यंत हसवणारी ,
काही आगळीक घडली तर एक सणसणीत मुस्कटात ठेवणारी ,
आपण न सांगताच आपल्या मनातलं ओळखणारी ,
कोणाच्याही समोर थट्टा केल्यावर न चिडणारी ,
थोडीशी Short -Tempered ,
अशीही एखादी मैत्रीण असावी .
अशीही एखादी मैत्रीण असावी.
●●●●●
तो :- कळलं का मॅडम जिंज्ञासू 😅😉
ती :- बापरे.....शी बाबा काय-काय विचार करतात ना तुम्ही मुलं 😂😂
आणि हो बरं का.. ती मी नव्हेच मुळीच...😬😉
तो :- हो......😂 🙏
••••••••••••••••••••••••••••••••
ती :- तुझं न माझ्यावर आता काही प्रेम-बिम्म राहिलेलंच नाही ! 🙄😏
तो :- हम्म, काय , म्हणजे काही ही...😲 अच्छा आणि ते का कळू शकेल मला ? 🤔
ती :- तुला न माझ्यासाठी कसा म्हणून काहीही वेळ राहिलाच नाही , सारखं नेहमी सो कॉल्ड busy च असतो 😏 ; अगोदर कसा पाहताच मला कविता सुचायचा तुला आणि आता एक साधी ओळ ही नाही सुचत 😔 , तूच सांग काय म्हणायचं याला आता 😤🤔
तो :- अग्ग माझी रुसू बाई , काय तू पण 😅 ; तुलाच तर नाही आवडत होतं ना मी असं तुज्यावर लगेच कविता करणं , तुलाच तर कसतरी होतं ना 😉 ;
असो...
आणि राहिला आता माझं तुज्यावर असलेल्या प्रेमाचा प्रश्न तर तुला मी कितीदा सांगितलंय कुणी कधी श्वास घेणं विसरता का 😉😆
घे, खास तुझ्यासाठी मोजून ४ ओळया 😂
👇
●●●●●
अशी काय जादू तुझ्यात आहे ,
माझं मलाच कळतं नाही....♥
रस्ते कितीही असले जीवनाच्या या वळणावर तरी ,
तुझ्याविना पाऊल मात्र माझं काही वळतच नाही....♥
●●●●●
••••••••••••••••••••••••••••••••
★★★★★
नमस्कार आपल्याला माझं हे कविता सांगण्याचा नवीन प्रयत्न कसा वाटला तो आपण मला आपल्या अमूल्य कंमेन्ट द्वारे कळवू शकता आणि जर का आपल्या काही सूचना ,अभिप्राय किंवा काही तक्रारी असल्यास ते आपण इथे , किंवा मला वयत्तीकरित्या मेसेज करून देखील सांगू शकता । 😇 🤘
आपल्या सर्व सुचनांचा सहर्ष स्वागत आहे , 🤘 आणि मला हे ही माहीत आहे की, जर मी कुठे काही चुकलो तर आपण मला सांभाळून घ्याल
(मी जरा गृहीत च धरतोय म्हणा तसं 😬 👻 )
❤️ 😅
असो,
बस हे शेवटचंच , 😬 🙏
👉
जर का आपल्याला माझी ही कलाकृती आवडल्यास ही जास्त-जास्त वाचक,लेखक मित्र-मैत्रिणीं सोबत share करा आणि त्यांना देखील वाचायला प्रोत्साहित करा । 😇 🙏
❤️ •• धन्यवाद ••❤️
★★★★★
आपलाच
-harsh_मधुरज़० ✍️
instagram :- www.instagram.com/manatlabyhrg
FacebookPage :- www.facebook.com/manatlabyHRG
E-mail id :- harshalhrg93@gmail.com
WhatsApp No. :- 866-88-22-900
अप्रतिम सुंदर हर्ष खुप छान लिहले👍👍👍👍👍🍁🌱🙏
ReplyDeleteमनापासून धन्यवाद सर 🤗✌️
Deleteवाहह...खुप सुंदर नवीन प्रकारे मांडल्या आपण कवीता... छान वाटलं वाचताना...मस्तच लिहीलय
ReplyDelete...👌👍💐
धन्यवाद मॅडम
Deleteमाझ्या लेखनावर आपलं प्रेम आणि सहकार्य असच असू द्या । 🤗