◆◆ बाबा ◆◆
काय सांगावं त्यांच्या बद्दल , कुठुन सुरू करावं
साधं हे देखील कळत नाहीये , दोन अक्षर (बाबा) जरी असले तरी देखील त्यांचं वर्णन शब्दात सांगणं म्हणजेच स्वतःची केलेली दिशाभूल आहे असं निदान मला तरी वाटतं , तरी सुद्धा माझ्या त्यांच्याबद्दल असलेल्या माझ्या भावनानां सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय .आशा आहे वाचक मित्रांना नक्की आवडेल .....
●●●●●●●●
असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही ,
" कुठल्या ही भाषेतले शब्द जिथे संपतात ,
तिथुनच , हो अगदी तिथुनच
" बाबा " ह्या शब्दाची
महिती ला खरी सुरुवात होते "
असं म्हणेल मी की , त्यांची महती अशी शब्दात तर मुळीच नाही मांडता यायची.
😣🙏
आपल्या आयुष्यातली हिच ती पहिली व्यक्ती ज्याने आपली ओळख या अनोळखी अश्या सुंदर जगाशी करून दिली.
" बाबा "
हे त्यांच्या मुलीचं पहिल प्रेम , तर त्यांचा मुलाचे ते पहिले Role Model असतात , त्याना पाहता-पाहताच आपण घळत असतो, मोठे होत असतो. थोडक्यात काय तर आजच्या परिस्थिती नुसार एका शब्दात सांगायचं झालं तर तेच
खरे " SuperHero " असतात.
हे तेच कायम म्हणणारे " तू काहीही काळजी करू नकोस , तू बस आयुष्यात पुढे जा बाकीचं बघायला तुझा " बाप " तुझ्यासोबत कायम तुझी सावली बनुन उभा आहे. " (शब्दाने कधिच नाही म्हणणार पण आपल्या action ने सदैव असंच म्हणतात , आतासुद्धा)
हे तेच ज्यांच्यामुळे आपल्याला आपली हक्काची अशी , ओळख मिळाली आणि ती म्हणजे आपल्या नावासोबत असलेलं त्यांचं नाव. 😇
हो , अजून एक सांगायचं आहे आता पर्यंत मी जे काही शिक्षण घेतलं आहे , फक्त आणि फक्त बाबा फक्त तुमच्यामुळेच
खरंच "बाबा" तुम्हीच आम्हाला खऱ्या अर्थाने
"अ" म्हणजे *अज्ञाणी* पासून , "ज्ञ" म्हणजेच *ज्ञाणी* बनवलंय.
वाईट एकचं वाटतंय की हे सगळं सांगण्याची तुम्हाला कधीच हिम्मत नाही झाली...
आणि तुमचा ते कडकपणा पाहून झालेली हिम्मत पण मग फिस्ट व्हायची, म्हणून हे असं लिहुन आपल्या भावनानां मोकळ्या करत आहेत.
तसं म्हणायचं झालं तर फार काही शिकलोय आता पर्यंत तुमच्याकडून आणि पुढे पण फार काही शिकायचं पण आहे ,मात्र मला २ गोष्टींचा इथे उल्लेख करावा वाटतो.
१ :- " कायम आपलं काळीज मोठं ठेवायचं , आणि समोर जात राहायचं ,कधी हरण्याच्या साधा विचार पण मनात नाही करायचा आणि मग पहा संकट कशे चुटकी सरशी आपली माघार घेतात."
२ :- " तू आपले कार्य प्रामाणिक पणे करत रहा , बाकी कुठल्याही गोष्टी ची काळजी करत बसू नको . "
😇 🙏
●●●●●●●
सांगायचं च झालं तर " बाबा " हे त्या कल्पवृक्ष नारळा प्रमाणे असतात , जे बाहेरून कितीही कठोर दिसत असले तरी आतून मात्र तितकेच मऊ आणि गोड . 😍😘
ज्या *आई-वडिलांची* कमी खुद्द देवाला सुद्धा भासते , त्यांची महती अशी शब्दांची रेलचेल करून मांडणं मला नाही वाटतं कुणाला पण जमेल , आणि जमलं तरी त्या नुसत्या त्या व्यक्ती च्या भावना च असणार बाकी काही नाही यात तिळ मात्र शंका नाही .
😇
●●●●●●●●●●
फक्त बाबांबद्दल बोलायचं , का तर म्हणे आज " जागतिक पितृ दिन " आहे. पण मला असं वाटते की " आई आणि बाबा " हे वेगवेगळे नसून ते एकच आहे कारण....त्या विषयावर पुन्हा कधी तरी. ✌️😊 एकच सांगावंसं वाटतंय , ते आहेत म्हणून च आपण आहोत आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे ,😇 त्यांना दुरावणं म्हणजे स्वयंभू असलेल्या देवाला दुरावणं.
●●●●●●●●●●
संपूर्ण विश्वालाच पहिलं मी माझ्या अंगणी जेव्हा पाहिलं (" आई बाबांना ") माझ्या घरी । वाटे जणू कृपाच झाली गजाननाची । पाहिली मी मूर्ती माझ्या " विठू-रखुमाई " ची ।।
😘 😇 🙏
●●●●●●●●●●
<<जागतिक पितृ दिना निम्मित >>
।।सर्व वाचक मित्र मैत्रिणींना जागतिक पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
विषय :- जागतिक पितृदिन साजरा करायचा की नाही ? 🤔
स्थळ :- Joggers Park. वेळ :- अर्थातच सकाळची 😉
भाषा :- Minglish(मराठी+English)
// काम :- दुसरं काय Morning Walk आणि सोबत बरंच काही (म्हणजे गप्पा टप्पा, बाकी काही नाही 😉)//
●●●●●●●●●●
मित्र :- अरे आज तर International FATHER'S day【जागतिक पितृदिन】 आहे ना.....
मी :- अरे हो यार ....
मित्र :- मग , तुझे काय विचार आहे या बद्दल , काय वाटतं तुला असं काही आपण साजरं केला पाहिजे का ? , अगोदर valentine म्हणजे प्रेम दिवस , मग Mother's day , Father's day , women's day आणि बाकी काय-काय नाही days... हुश्श...😉 .
तुला नाही वाटत का आपण आपली संस्कृती विसरून आपल्यावर पाश्चात्य संस्कृती लादून घेत आहोत ? 🤔
मी :- खरंच आपण हे अशे specific दिवशी साजरं करून आपल्यावर खरंच लादत आहोत का ?
आपल्याला या बद्दल आता विचार करायची गरज आहे का ?
आपण आपल्या संस्कृती ला स्वतः च तिच्या अंता कडे प्रवत करत आहो का ? 🙄🤔 ( मनातल्या मनातच)
आणखी बरंच काही-काही , माहीत नाही काय-काय विचार येऊन गेलेत एवढ्या एका साध्या प्रश्नावर.....
आणि त्या नंतर मी माझे विचार माझ्या मित्राला सांगितले आणि आपलं त्यावर असलेलं मत देखील स्पष्ट केलं.
इथे मी माझे विचार संदर्भात मांडण्याचा एक छोटा-सा प्रयत्न केलेला आहे , तरी कुठे काही चुकलं तर लहान भाऊ समजून चूक आपल्या पदरात द्या अशी विनंती करतो 😊 🙏
।। कुठे काही चूक झाल्यास परत क्षमस्व ।।
●●●●●●●●
सरळ विषयाला च हाथ घालतो
तर विषय असा आहे की आपण खरंच ह्या अश्या पाश्चात्य प्रथा आपल्यावर लादत आहो का ?
मला वाटते हो , आपण स्वतः ला प्रतिबंध करत आहोत......
कारण एकच , आपल्या देशाला एक वेगळीच सभ्यता आणि संस्कृती लाभली आहे , आपल्याकडे मोठ्याला मान द्यायला , त्यांचा आदर करण्याचं अगदी लहान बाळ असल्या पासून च आपल्या ला शिकवलं जाते , नमस्कार, मोठ्यांच्या पाया पडणं त्यातलाच एक भाग म्हणा हव तर
तर मला हे सगळे दिवस अगदी थोतांड वाटते (निदान आपल्याकडे तरी ) , हे अशे दिवस गणिक ठरवायचे आणि मग काय ते साजरे करायचे.
अरे पण आपल्याला काय गरज ह्या अश्या दिवसांची , आमच्या कडे सकाळी उठल्या उठल्या पोरं आई वडिलांचे , घरातल्या थोरल्या मोठ्यांचे पाय पडून त्यांचे शुभाशीर्वाद घेतात आणि आपल्या दिवसाची सुरुवात करतात , त्या मागे त्यांचं समझ असा असतो की थोरल्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतला की आपला दिवस आनंदाने आणि त्यांच्या असलेल्या आशीर्वादा मुळें सर्व कार्य फळाला लागेल .....
जेव्हा आपल्याकडे ही अशी संस्कृती आहे ज्या मध्ये आपण रोज रोज आपल्या मोठ्यांच्या मान ठेऊन ताट मानेने समाजात वावरतो तर मग काय गरज आहे हे अशे दिवस साजरे करण्याची .......
●●●●●●●●●●
पण
मला एकच प्रश्न करायचा आहे...
आजकालच्या जीवनात जेव्हा वेळ आणि माणूस सारख्या गती ने धावण्याचा प्रयत्न करतोय आणि स्वतः ला एकमेकांपेक्षा वरचड करण्याचा गाफील प्रयत्न करतोय मग ही आपली ही सो कॉल्ड भारतीय संस्कृती कोण-कोण follow करतोय ?🤔🙄
●●●●●●●●●●
आजकालच्या ह्या धावपडीच्या जीवनात कोण-कोण हे सगळं 'follow' करतं , आणि हल्लीआता किती जॉईंट family उरल्या आहेत आपल्या मानव समाजात , 😪
आणि कदाचित ह्यामुळे तर नाही ना आपण हळू हळू सगळं काही गमावून बसत आहोत 🤔
मग तेव्हा मला आठवण येते या अश्या दिवसांची , एकच दिवस का असो ना पण सगळे निदान त्याच बहाण्याने सोबत तर येतात ,गप्पा टप्पा होतात , वाद विवाद देखील होतात no doubt , पण महत्वाचं म्हणजे नातं ते हळू हळू उलगळत जातं आणि प्रेम आणि आपुलकी स्वतः च आपल घर बनवते तिथे
आणि बरं का ते ही कायमस्वरूपाचं , हो शेवटी आपल्यावरच आहे म्हणा बाकी च्या गोष्टी म्हणून च काय की , मला हे अशे दिवस आजकाल हवे हवेशे वाटतात 😪🙌
जसं आताच्या वेळेस होणाऱ्या वाढदिवसाचं Celebration 💐🎂
जीवनात हे struggle, tension , frustration आणखी बरंच काही हे तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार पण त्यात देखील आनंद शोधणं हे देखील आपलंच काम नाही का ... 😇 ✌️
मी आता आपली लेखणी ला इथे विराम देतो , आणि परत एकदा जागतिक पितृदिना निम्मित सर्व वाचक मित्रांना हार्दिक शुभेच्छा देतो 😇🙏
●●●●●●●●●●
।। माझे विश्व - माझे आई बाबा ।।
●●●●●●●●●●
सर्व वाचक-लेखक मित्र मंडळीना माझा नमस्कार 🙏
आपल्याला माझी ही नवीन कलाकृती कशी वाटली आपण ते त्यावर आपल्या अमूल्य प्रतिक्रिया देऊन व्यक्त होऊ शकता
आणि
जर आपल्या काही सूचना, संदेश असल्यास तो देखील कळवू शकता 🤗
आपल्या सर्व सूचनांचे सहर्ष स्वागत आहे 🤘 ❤️
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत ।
😇 🙏
आपलाच
-harsh_मधुरज़०✍️
आपण मला खालील लिंक द्वारे वेगवेगळ्या Social Media ला Follow देखील करू शकता ।
खास आपल्या साठी
😄❤️
👇
instagram :-https://www.instagram.com/manatlaby_hrg/
FB_Page :- https://www.fb.com/manatlabyHRG
E-mail id :- harshalhrg93@gmail.com
WA_No. :- 866-88-22-900
★★★★★
Nice 👌🏻👌🏻🙌🏻
ReplyDeleteखूप छान लेख लिहिलाय👌
ReplyDeleteआणि सुंदर भावना व्यक्त केल्या ..🙏
आबा...🙏
हृदय स्पर्शी..... लेख वाचून मलाही माझ्या वडिलांची आठवण झाली...👌👍✍️🍫🌹🙏
ReplyDeleteखुप छान लेखन 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDeleteअतिशय सुंदर असे नाते उलगडून दाखवले आहे तुमच्या
ReplyDeleteलिखाणातून.वडील असतातच असे निर्व्याज प्रेम करणारे
भक्कम आधारस्तंभा प्रमाणे कायम पाठीशी उभे राहतात.👌👌👌👌🙏
अतिशय सुंदर व सुरेख लिहिल आहेत तुम्ही....
ReplyDeleteखूप छान लेख आणि सुंदर भावना शिर्षक अती उत्तम
ReplyDelete