------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
★ ती आणि तो ★
ती- हर्षु ऐकते का अरे वेळ आहे का जरा माझ्यासाठी ?🙄
तो- हो ना जान , माझा वेळ काय तुझ्यासाठी तर संपूर्ण जीवन आहे माझं 😘😘 बस थांब ना थोडं बस 5 मिनिटच मग आरामात बसून कॉफी च घेऊया ना मस्त गॅलरी मधेच, प्लीज बस शेवटचे 5 मिनीटच...❤️🤗
ती- हो तुझे 5 मिनिट- 5 मिनिट करता करता 1 तास झाला आता 🙄😏 , तुला ना काही माझं घेणं देणच नाही , माझी किंमत तुझ्या भाव विश्वात काही राहलेलीच नाही 😣
तो- बाप्पा बाप्पा ,इमोशनल ब्लॅकमेल हा मोटे....😃😃( प्रेमाने ती आणि तो एकमेकांना मोटे संबोधत असे ।😉)
थोडं बॅकग्राऊंड :- (तो आजकाल आपल्या कामात जरा जास्तच व्यस्त असल्या मुळे तिला ,त्याचा हवा तितका वेळ तो देऊ शकत नव्हता म्हणून की काय आजकाल तिच्या मनाची जरा जास्तच घालमेल होत होती, आणि त्यामुळे ती कायम त्याचं लक्ष आपल्या कडे कसं करता येईल याचा प्रयत्न ती करत असे।
आणि तिला हे ही ठाऊक होतं की जसा काहींच्या मनाची जागात्यांच्या पोटातून जाते तशी याची कवितेतून जायची (हो ..हो माहीत आहे जरा विचित्र आहे पण काय करणार वेगळा च होता तो...किमान तिच्यासाठी तरी) 😃) 😅
ती - इमोशनल ब्लॅकमेल नाही खरं तेच बोलत आहे मी 😏
मला सांग गेल्या २ हफ्ता तू घरी आहे , माझ्या जवळ आहे , तूला आठवते तरी का तू मला स्वतः जवळ कधी घेतलं होतं या गेल्या २ हफत्यात तरी 🙄
तो - अगं......हा....म्हणजे.....तसं नाही काही.....🤐 😬
ती - मला ठाऊक आहे तुला या मिळालेल्या संधीच सोनं करायचं आहे , आणि मी तुला अळवत देखील नाही आहे , पण निदान २४ तासातून काही तास तरी माझ्या वाटेला यावे हीच काय ती माफक अपेक्षा न माझी....की यात ही चूकच....हा😧
तो - हो गं माझी सडू बाई कळतंय मला तुझं आणि १०० टक्के पटत देखील आहे ।
हो ठाऊक आहे मला की, मी तुझ्या जवळ असून देखील तुला हवा तितका वेळ नाही देऊ शकत आहो , मी कदाचित तुझ्या जागेवर असतो तर या पैकी १० टक्के ही नसतं जमलं ग मला आणि उलट माझी किती चिडचिड झाली असती ती काही तुला वेगळं सांगायला नको मुळीच ।😬
इतकं असून सुद्धा तरी तू फार समंजसपणाने सगळं काही बरोबर हाताळताय , मला हवंनको ते पाहण्यापासून ते माझ्या मूडी स्वभाव संभाडण्यापर्यंत तुझी किती दमछाक होत आहे ते सगळं जाणवत आहे मला 😰
पण....असो सोड आता हे सगळं 🤗
ती - हुश्श.....बापरे....किती काय काय साठवुन ठेवलंय रे तू मनात तुझ्या 😳, मला बिल्कुल पत्ता नाही लागू देत हा मोटू.....बरं जाऊ दे सोड चल आज मी कविता करते तुज्यासाठी😜
तुझ्याइतकी गोडतर नाही होणार म्हणा पण प्रयत्न करते जरा 😘😬
हा पण मला तुझी साथ लागेल बरं.....तुझ्या विना मी काय करणार बिचारी एकटी 😉😁
तो - हो का नाटके......😂👊
ती - चल तर मग करते मी सुरू ....(गळा साफ करत)😉😁
ती - येणा जाणून घेणा श्वासाची ही आज बोली,
स्पर्शून जाणं तुझं मज, गाई नवी कोरी गाणी,
ये जवळी माझ्या , सख्या दूर तू का सारखा । 😧
तो - उमले पहाट या आज प्राजक्त वेळी,
लोचनात तुझिया हरपून जाईल मग मी ,
नजरेत या तुझ्या वाटे मला, विसरावे जगाला सारखे 😉 😘
ती - दिसता मज तू वाटे जणू बिलगाव तुजला वाऱ्यासारखे
भिनू देत तुझी नशा, आज अशी देहा वरती ....
तू असता वाटे हे, जग थांबावे तसे । 😬 ❤️
तो - .................(मी तर निःशब्द झालो बा आता , आता नाही सुचत काही मला...अच्छा मला एक सांग तू तितक्या लांब का बसली आहेस....तुझ्या गालाला काही लागलं आहे पाहू बरं जरा....... 😘❤️😬
आणि
मग एक मेकांना वेळ देऊ या वचनावर , ते दोघेही प्रेमाच्या प्रेमरंगात रंगुनी गेले।
🤗 ✌️
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्याला माझी ही नवीन रचना कशी वाटली ते आपण आपल्या अमूल्य प्रतिक्रिया देऊन नोंदवा 🤗 ✌️
आणि
आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत देखील share (सामायिक) करा.✌️☺️
आपल्या अमूल्य प्रतिक्रिया च्या प्रतीक्षेत
आपलाच
-harsh_मधुरज़० ✍️ 😇
instagram :- www.instagram.com/manatlabyhrg
FacebookPage :- www.fb.com/manatlabyHRG
E-mail id :- harshalhrg93@gmail.com
WhatsApp No. :- 866-88-22-900
अप्रतिम रचनाविष्कार!✍️������
ReplyDeleteधन्यवाद सरजी 🤗
Deleteवा, खूप सुंदर लिखाण आणि रचना 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद ताई 🤗✌️
Deleteखूप छान लिहिलंय अप्रतिम 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद नित्या ताई 🤗✌️
Deleteखुप छान लिखाण
ReplyDeleteधन्यवाद दादा ☺️🙏
Deleteखूपच छान 👌🏻👌🏻
ReplyDeleteअतिशय सुरेख रचना केली दादा 👌👌👌
ReplyDeleteखूप खूप सुंदर आणि अप्रतिम रचना 👌👌👌👌👌👍👍👍👍👍✍️✍️✍️
ReplyDeleteखुपच सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप सुंदर लिहिलय👌👌👌👌
ReplyDelete